Blog Details

Post Images

युवा गिर्यारोहक सानिका शाह यांना मुख्यमंत्र्यांकडून मिळाली शाबासकी अन् शुभेच्छा

जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (8848 मीटर) यशस्वीपणे सर करणाऱ्या मुलुंड, मुंबई येथील 21 वर्षीय गिर्यारोहक सानिका शाह यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. 

सानिया यांनी  २० मे २०२६ रोजी माउंट एवरेस्ट शिखर सर केले होते.  या मोहिमेदरम्यान सानिया यांनी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यमचा अनोखा नृत्याविष्कारही सादर केला होता. सानिका यांनी यापूर्वी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो, युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस आणि नेपाळमधील 7126 मीटर उंचीचे शिखर माउंट हिमलुंग हिमाल यशस्वीरित्या सर केले होते, जे एव्हरेस्ट मोहिमेच्या तयारीसाठी उपयुक्त प्रशिक्षण शिखर म्हणूनही ओळखले जाते.

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी सानिका यांच्या या अद्वितीय आणि ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  यावेळी आमदार मिहीर कोटेचा उपस्थित होते.

सानिका शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माउंट एव्हरेस्ट Mountaineering Mount Himlung Himal Mihir Kotecha मुंबई

Share :

Write your comment

Cancel Reply