Blog Details

Post Images

शेतकरी चळवळीचे नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलन चौथ्या दिवशी अधिक तीव्र 

पुणे, ता. १८ -  शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, या मागणीसाठी शेतकरी चळवळीचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात पुकारलेले अन्नत्याग आंदोलन आज, गुरुवारी (ता. १८) चौथ्या दिवशी तीव्र झाले आहे. तुपकर यांना साथ देण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. मुंबईतही त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून जलसमाधी आंदोलन केले जात आहे. त्यामुळे आता प्रशासाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रात्री तुपकरांची तब्येत खालवाल्याने तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे.  डॉक्टरांच्या अहवालनुसार तुपकर यांच्या शरीरातील साखरेच प्रमाण हे अतिशय कमी झाले आहे. मात्र, रविकांत तुपकर माघार घ्यायला तयार नसल्याने आता शासनाने तात्काळ उपोषणाची दखल घेऊन निर्णय घ्यावा या मागणीसाठी शेतकरी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वाशिममध्ये अकोला-हैद्राबाद महामार्गावर टायर जाळून तीव्र आंदोलन करण्यात आले, शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  या आंदोलनामुळे काही काळ अकोला–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यात आली.

 मलकापूर तालुक्यातील वाघुळ येथील संतप्त शेतकऱ्यांनी निषेध नोंदवत स्वतःच्या खर्चाने घेतलेलं सिंचन साहित्य पेटवून दिले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अशी एकमुखी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

रविकांत तुपकर शेतकरी आंदोलन Maharashtra Farmers Hunger Strike

Share :

Write your comment

Cancel Reply