Blog Details

Post Images

खासदार पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात होणार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात होणार आहे.  कायनात या मूळच्या हरियाणातील असून सध्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या मुंबईतील विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार आणि कायनात धार यांनी एकत्र उपस्थिती लावली होती. त्यानंतर, दोघांच्या उपस्थितीची सर्वत्र चर्चा रंगली असताना दोघांच्या साखरपुड्याची छानशी बातमी आली आहे. 

कायनात धार यांचे पवार कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही महिन्यांत त्या पार्थ पवार यांच्यासोबत विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांनी मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते. त्यावेळचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. कायनात धार यांची पवार कुटुंबातील विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती सातत्याने पाहायला मिळाली आहे.

Parth-Pawar Engagement कायनात धार राष्ट्रवादी काँग्रेस

Share :

Write your comment

Cancel Reply