Blog Details

Post Images

'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६'साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ

 केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६'साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रदान केला जातो. केंद्राच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने यंदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या नव्या नियमांनुसार, शिक्षकांना आता कोणाच्या शिफारशीची वाट न पाहता स्वतःचे नामांकन स्वतःच दाखल करता येणार आहे. ही ऑनलाइन प्रक्रिया १५ जूनपासूनच सुरू झाली असून, शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्जासाठी  https://nationalawardsto teachers.education.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. इच्छुक आणि पात्र शिक्षकांनी येत्या १० जुलैपर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ शिक्षक पुरस्कार १० जुलै अर्ज अंतिम तारीख Teacher Award 2026 School Education National Teachers Award

Share :

Write your comment

Cancel Reply