Blog Details

Post Images

कोल्हापूरातील श्री महालक्ष्मी मंदिराच्या विकासाकामांचा प्रारंभ 

कोल्हापूर येथे करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांचा प्रारंभ  कोनशीलेचे अनावरण करून करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यांच्या हस्ते मंदिर परिसरातील रामाचा पार येथे श्रींच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिर संवर्धनासह मुख्य मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंदिर आराखडा प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह विविध विभागांचे मंत्री व मान्यवर उपस्थित होते.


Kolhapur Mahalaxmi Temple श्री महालक्ष्मी मंदिर अंबाबाई मंदिर देवेंद्र फडणवीस मंदिर संवर्धन करवीर निवासिनी प्रदक्षिणा मार्ग

Share :

Write your comment

Cancel Reply