धाराशिवमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल; बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीतील अनियमिततेवर कारवाई
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने धाराशिव जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविली. या तपासणीदरम्यान आढळलेल्या अनियमितता आणि शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत जिल्ह्यातील 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
कृषी विभागाच्या प्राथमिक तपासणीत काही कृषी सेवा केंद्रांकडे आवश्यक नोंदी अपूर्ण असल्याचे, तसेच कृषी निविष्ठांच्या विक्री प्रक्रियेत नियमांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर संबंधित केंद्रांना नोटिसा बजावून निलंबनाची कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत पावती घ्यावी आणि कोणतीही अनियमितता आढळल्यास तातडीने कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Write your comment
Cancel Reply